शारिरीक संबंधास नकार, प्रायव्हेट पार्टवर टाकले अॅसिड
अॅसिड विक्रीवर बंदी असतानाही त्याची विक्री खुलेआम सुरू आहे. त्याद्वारे माणूसकीला काळिमा फासणा-या अनेक घटना घडत आहेत.
कानपूर : अॅसिड विक्रीवर बंदी असतानाही त्याची विक्री खुलेआम सुरू आहे. त्याद्वारे माणूसकीला काळिमा फासणा-या अनेक घटना घडत आहेत.
अशीच एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना य़ूपीतील कन्नोजमध्ये घडली आहे. इथे एका पतीने आपल्या पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर अॅसिड टाकून तिला जखमी केले. पत्नीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने निर्दयी पतीने हे कृत्य केल्याचे वॄत्त आहे.
नवभारत टाईम्स वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना सोमवारी घडली. पीडितेच्या आई-वडीलांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही घटना समोर आली. महिला बहरीन गावात राहणारी आहे. पीडित महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने आरोप केलाय की, तिचा पती शारिरीक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करत होता. पण तिने नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या पतीने तिच्या गुप्तांगावर अॅसिड टाकले. त्यानंतर महिलेची स्थिती गंभीर झाली.
पीडित महिलेचे लग्न आरोपीसोबत साधारण ६ वर्षांपूर्वी झालं होतं. आणि पती आणि २ मुलांसह बहरीन गावात राहत होती. कन्नोज एसपी हरीशचंद्र यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपीसहीत ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आरोपी अजूनही फरार आहेत.