Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ शिकवण देणारे असतात, तर काही मात्र फक्त मनोरंजनासाठी असतात. पण आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ दुचाकी चालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला घाई असते. अशीच घाई व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तीला झाली असावी. त्यामुळे ही व्यक्ती दुचाकीवरून मोठ्या प्रमाणात सामान घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तेलंगणा पोलिसांनी वाहनचालकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओ सागर नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'माझा 32 GB चा फोन ज्यामध्ये 31.9 GB चा डेटा आहे...' असं लिहिल आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुचाकीवरुन मोठ्या प्रमाणात सामान घेऊन जाताना दिसत आहे. या व्यक्तीने हेल्मेट घातला आहे. पण त्याचे पाय जमीनीला टेकत आहे. शिवाय स्कूटीवर बसण्यासाठी पुरेशी जागा देखील नसल्याचं दिसून येत आहे. 



व्यक्तीचा व्हिडीओ तेलंगणा पोलिसांनी पाहिल्यानंतर रिट्विट करत, 'मेबईलमध्ये आपण डेटा पुन्हा रिचार्ज करु शकतो, पण आयुष्य नाही...' असा सल्ला दिला आहे. व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. 


एका युजरने कमेंटमध्ये, 'त्याने हेल्मेट घालून नियमांच पालन केलं आहे...' असं लिहिलं आहे.  व्हिडीओमधील व्यक्तीने हेलमेट घातल असलं तरी दुचाकीवरून एवढ्या वजनाचं सामान ठेवणे घातक ठरु शकतं.