मुंबई : मनोरंजनाचे माध्यम असण्यासोबतच सोशल मीडिया हे लोकांना बरंच काही शिकवते देखील. लोकांना बऱ्याच गोष्टीचं ज्ञान हे सोशल मीडीयावरुन मिळतं. सोशल मीडियावर अगदी आपल्या भारतातील पॉलिटीकल अपडेट पासून ते देशाबाहेर देखील अनेक गोष्टी पाहायला मिळतात. तर येथे आपल्यासमोर असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो प्रत्येकाच्या अंगावर काटा आणणारा आहे. परंतु हा व्हिडीओ तितकाच रोमांचक देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला तर हे माहित आहे की, आताच्या नवीन पिढीला एडवेंचर करायला किती आवडते. यासाठी ते अनेक पैसे खर्च करतात. परंतु कधीकधी असं धाडस करणं अनेकांच्या जीवावर बेतु शकतं.


या व्हिडीओतील तरुण हा एका डोंगरकड्यावर येऊन उभा राहातो आणि बॅक फ्लिप मारतो. तो हे करताना पाहून आपल्या अंगावर काटा उभा राहातो. परंतु नंतर हा तरुण त्या पाण्यात पडतो आणि या क्षणाचा मनसोक्त आनंद घेतो.


सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच लोकांनी या व्हिडीओचा आनंद लुटला. एवढेच नाही तर अनेक लोकांनी या तरुणाच्या या ब्लॅक फ्लिपचं कौतुक देखील केलं. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळे कमेंट केले.



परंतु हे लक्षात ठेवा की, हे असं कृत्य करणं तुमच्या जीवावर बेतु शकतं, त्यामुळे शक्यतो असा प्रकार करणं टाळा. तुमचे घरचे तुमची वाट पाहात असतात आणि त्यांना तुमची गरज असते. हे नेहमी लक्षात ठेवा.


या तरुणाचा स्टंट पाहून तुम्हालाही या मुलाच्या सरावाची कल्पना आली असेल. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यासाठी सराव, शिस्त आणि प्रेरणा असणे अत्यंत आवश्यक आहे.