बिहारः बिहारमधील एका व्यक्तीच्या पोटात सतत दुखत होते. पोटदुखीने हैराण झालेल्या व्यक्तीने दवाखाना गाठला. डॉक्टरांनाही कारण कळेना सोनोग्राफी करतानच डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. अखेर डॉक्टरांनी व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातून दोन मोठे चमचे काढले आहेत. या घटनेने एकच खळबळ व्यक्त करण्यात येत आहे. 


दोन चमचे कसे काय गिळले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या लखीसराय येथे 25 वर्षीय युवकासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पटना येथील इंदिरा गांधी आयुर्विज्ञाम संस्था ( IGIMS) येथील डॉक्टरांनी यशस्वी ऑपरेशन करुन तरुणाच्या पोटातून दोन चमचे काढले आहेत. सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर असून या प्रकाराने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, तरुणाने दोन चमके कसे काय गिळले याचे कारण ऐकून डॉक्टरही चक्रावले आहेत.


व्यक्ती पोटदुखीने हैराण


लखीसराय येथे राहणाऱ्या व्यक्तीने दारूच्या नशेत दोन चमचे गिळले होते. त्यानंतर काहीच दिवसात त्याच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. पोटदुखीने हैराण झालेल्या  या तरुणाला पटनाच्या मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तरुणाची तपासणी केल्यानंतरही त्यांना कारण कळले नाही. त्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्या पोटात दोन चमचे असल्याचे आढळले. त्यानंतर या घटनेची गांभीर्य ओळखून आईडीआईएमएसच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे मेडिकल अधीक्षक डॉ. मनीष मंडल यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमने त्याच्यावर योग्य ते उपचाप सुरु केले. 


शस्त्रक्रिया करुन काढले चमचे


डॉ. मनीष मंडल यांच्या पथकाने एंडोस्कोपिक पद्धतीने तरुणाच्या पोटातून दोन चमचे बाहेर काढले आहेत. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया चालली होती. डॉ. मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वैद्यकीय शक्यतांचा पर्याय पाहिल्यानंतर व अभ्यास केल्यानंतर आम्ही एंडोस्कॉपिक पर्याय वापरण्याचा निर्णय घेतला. आणि आज शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. 


24 तासांनी पाठवले घरी


शस्त्रक्रिया झाल्यानंतर जवळपास 24 तास त्यांना डॉक्टरांच्या दक्षतेखाली ठेवण्यात आले होते. त्यांना काही त्रास तर होत नाहीये ना हे पाहण्यात आले. त्यानंतर त्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर डॉक्टरांचेही आभार मानण्यात आले आहेत. 


पोटातून एखादी मोठी वस्तू काढल्याची ही तिसरी घटना आहे. या पूर्वी एका आरोपीच्या पोटातून एक मोबाईल काढण्यात आला होता. तर, एका तरुणाच्या पोटातून सोन्याचे बिस्किट काढण्यात आले होती.