Selfie With Python: तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा सापांना भांडताना पाहिले असेल. अनेक व्हिडिओंमध्ये साप एकमेकांशी किंवा इतर कोणत्याही प्राणीशी भिडताना दिसतात. पण असाा एक धक्कादायक व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला नसेल. जिथे एकीकडे सापाच्या नावाने अनेकांना भीती वाटायला लागते, तर दुसरीकडे एक व्यक्ती सापाशी नाही तर धोकादायक अजगराशी जे करते ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक केल्यावाचून राहणार नाही. तेव्हा तुम्ही हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा ट्रेंडिंग व्हिडिओ एकदा पाहिला पाहिजे.


या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क अजगरसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नाही किंवा साप हल्ला करण्याच्या मनस्थितीत आहे असेही दिसत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स चक्रावून गेले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओने लोकांचे होश उडाले आहेत. हा व्हिडिओ हजारो लोकांनी लाइक केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकजण वेगवेगळ्या आणि मजेदार प्रतिक्रिया देताना दिसले.