जेवण बनवायचं की वजन करायचं... कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है! पाहा व्हिडीओ
या तरुणाला इंडक्शन आणि वजन काट्यामध्ये प्रश्न पडला, नेमकं काय प्रकऱण पाहा व्हिडीओ
मुंबई: सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पोट धरून हसायला लावतात तर कधी डोळ्यात पाणी आणतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण खरेदी करण्यासाठी एका मोठ्या दुकानात गेलाय. तिथे त्याला एक वस्तू दिसली आणि प्रश्न पडला आहे.
या तरुणाला इंडक्शन आणि वजन काट्यामध्ये प्रश्न पडला आहे. यावर जेवण करायचं की वजन असा प्रश्न त्याला पडला आहे. त्याच्या हातात इंडक्शन दिसत आहे. हा इंडक्शन घेऊन तो त्यावर वजन करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा इंडक्शन उचलून तरुण त्याला न्याहाळतो. नंतर खाली ठेवून त्याच्यावर वजन करण्याचा प्रयत्न करतो.
तरुण या इंडक्शनला वजन करण्याचं मशीनच समजत आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर दोन्ही यंत्र थोडीफार दिसायला सारखीच असतात. त्यामुळे या दोन्हीमध्ये तो कन्फ्यूज झाला असावा. त्याला नेमकं हे जेवण करण्यासाठी की वजन करण्यासाठी आहे हे समजलं नसावं.
हा ट्रेन्डिग व्हिडीओ 1 लाख 67 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर लोकांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. हे काय करतोय असं एका युझरने म्हटलं आहे. तर दुसरा युझर म्हणतो की इंडक्शन म्हणत असेल की मुलाचा जीव घेता का? तिसरा युझर म्हणतोय हे लोक कोण आहेत असे लोक कुठून येतात. अशा मजेशीर कमेंट्स अनेक युझर्सनी केल्या आहेत.