नवी दिल्ली : खतरनाक बाइक स्टंटचा आणखी एक व्हिडिओ सोशलमीडियावर वायरल झाला आहे. एका व्यक्तीने आपल्या मोटारसायकलवर स्टंटचा प्रयत्न केला खरा, परंतु तो जिवावर बेतला असता. असं  झालं नसलं तरी, या व्यक्तीच्या स्टंटमुळे शेजारच्यांच्या भिंतीचे नुकसान झाले आहे. हा खतरनाक स्टंट त्याला एवढा महागात पडेल असेल असे त्याला वाटलं नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओला 'splendor_bullet_love' नावाच्या युजरने इंस्टाग्रावर पोस्ट केला आहे. काही दिवसातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या व्हिडिओला हजारो लाइक आणि शेअर आले आहेत.



व्हिडिओतील तरुण स्टंट करण्याचा प्रयत्न तर करतो. परंतु पाण्यात बँलेन्स बिघडल्याने बाईक सरळ शेजारच्यांच्या कंम्पाऊंड वॉलवर जाऊन आदळते. सुदैवाने तरुणाला यात दुखापत झालेली नाही. परंतु शेजारच्यांच्या भिंतीचे नुकसान झाल्याने तरुणाला मोठी भरपाई द्यावी लागणार आहे.