नवी दिल्ली : कोलकातामध्ये धोतर परिधान करणाऱ्या एका व्यक्तीला मॉलमध्ये एन्ट्री नाकारली गेलीय. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी क्वेस्ट मॉलमध्ये ही घटना घडली. या व्यक्तीनं पारंपरिक पद्धतीनं धोतर परिधान केलं होतं. यावेळी त्या व्यक्तीसोबत त्याची एक मैत्रिण - कोलकाता बेस्ड अभिनेत्री देबलीना सेनही उपस्थित होती.


देबलीना यांनी ही घटना सोशल मीडिया फेसबुकद्वारे लोकांच्या समोर मांडलीय. 



देबलीनाच्या मते त्यांच्या मित्रानं अत्यंत शालीन ड्रेस परिधान केला होता. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं. परंतु, या मॉलच्या अटिनुसार इथं धोतर किंवा लुंगी परिधान करून येण्याची परवानगी नाही. त्यामुळे गेटवर उभ्या असलेल्या मॉलच्या सिक्युरिटीनं मॉल मॅनेजमेंटशी चर्चा केल्यानंतर धोतर किंवा लुंगी घालून येणाऱ्यांना प्रवेश नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं.