नवी दिल्ली : जामियानगरमध्ये सीएएविरोधात रॅली सुरु होण्याआधी गोळीबाराची धक्कादायक घटना काही दिवसांपुर्वी समोर आली होती. दरम्यान शाहीनबागमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. कपिल गुर्जर असे या आरोपीचे नाव आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


३० जानेवारीला जामिया मिल्लिया इस्लामियाहून राजघाट दरम्यान सुरु असलेल्या रॅलीवर एका तरुणाने गोळीबार केला होता. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला होता.