टोकियो : इथे लोकांना एका प्रियसीचे नखरे सांभाळताना नाकी नऊ येतात. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती 35 प्रियसी बनवल्यानंतरही 36 व्या प्रियसीबद्दल विचार करतो. तेव्हा त्याचे काय होत असेल याचा विचार करा. हे ऐकून तुम्हाला नक्कीच विचित्र वाटले. परंतु हे सत्य आहे. जपानमध्ये एका व्यक्तीने एकामागून एक 35 प्रियसी बनवल्या  आणि त्याला त्याचं व्यसनचं लागलं. ही बातमी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क पोस्टमधील वृत्तानुसार, 35 मुलींशी रिलेशन असल्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीने सर्व प्रियसींना आपला वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी असल्याचे सांगितले. हे प्रकरण एका मनोरंजक मार्गाने उघड झाले आहे.


गिफ्टच्या शौकमुळे गुन्हेगार


अहवालानुसार पोलिसांनी तकाशी मियागावा या 39 वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याच्या 35 प्रियसी आहेत. त्या व्यक्तीला त्याच्या पहिल्या प्रियसीने वाढदिवसाला त्याला गिफ्ट दिला. त्यानंतर त्याला गिफ्ट घेण्याचा शौक सुरु झाला आणि त्यासाठी त्याने नवीन मुलींना इम्प्रेस करण्यास सुरूवात केली आणि 35 प्रियसी बनवल्या.


महत्त्वाचे म्हणजे, त्याने आपल्या जुन्या प्रियसीला कधीच सोडले नाही, तो सर्वांना एकत्र डेट करत असे. हे फक्त गिफ्ट मिळवण्यासाठी त्याने केले. पण यादरम्यान, त्याची एक चुक त्याला भारी पडली. 35 प्रियसी करणारी ही व्यक्ती पार्ट टाईम कामगार आहे. तो घरोघरी जाऊन माल विकतो. हा व्यक्ति मार्केटींग कंपनीच्या माध्यमातूनच या सर्व मुलींना भेटला.


त्या व्यक्तीने एका प्रियसीला सांगितले की, त्याचा वाढदिवस २२ फेब्रुवारीला आहे, तर दुसरीला सांगितले की, त्याचा वाढदिवस जुलैमध्ये आहे. याशिवाय त्याने तिसरीला सांगितले की, त्याचा वाढदिवस एप्रिलमध्ये आहे. परंतु त्याचा खरा वाढदिवस प्रत्यक्षात 14 नोव्हेंबरला असतो. त्याने हे फक्त महागडे गिफ्ट्स मिळवण्यासाठी हे केले होते.


ती व्यक्ती जपानी रोमियो म्हणून प्रसिद्ध 


जेव्हा त्याच्या 35 प्रियसींपैकी एकी ने त्याच्यावर संशय घेतला, तेव्हा हे उघड झाले.  त्या व्यक्तीविरूद्ध तक्रार दाखल झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि तुरूंगात पाठवले आहे. मियागावाने सर्व 35 मुलींना वचन दिले होते की, तो त्यांच्याशी लग्न करेल. ही व्यक्ती आता जपानी रोमियो म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध होत आहे.