सुलतानपूर : मोदी सरकारमधील मंत्री मनेका गांधी यांनी मतदारांना अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे मनेका गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. मनेका गांधी या लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या आहेत. प्रत्येक मतांसाठी आटापिटा सुरु झाला आहे. उत्तर प्रदेशात निर्णायक मुस्लिम मतांसाठी चांगलाच आटापिटा सुरु झाला आहे. मनेका गांधी यांनी, मुस्लिमांनो मते मला द्या नाहीतर माझ्याकडे कामासाठी येऊ नका, असे म्हटल्याने वाद निर्माण झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी झालेय. उत्तर प्रदेशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. आता २०१९ च्या निवडणुकीत एक एक जागा महत्वाची होत असल्याने प्रत्येक समाजाला हाक दिली जात आहे. पहिल्यांदा बसपा प्रमुख मायावती यांनी थेट मुस्लिमांकडे मते मागितल्यानंतर आता त्यामध्ये केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची भर पडली आहे. मी खासदार होणारच आहे, मुस्लिमांनो मते मला द्या नाहीतर माझ्याकडे कामासाठी येऊ नका, असा अप्रत्यक्ष इशाराच मनेका यांनी दिला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 


मनेका गांधी यांचा हा वादगस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनेका यांनी मुस्लिमांना मैत्रीचा हात दिला. त्या म्हणाल्या, परतून काही मिळत नसेल, तर नेहमीच देणारा देऊ शकत नाही. मी निवडणूक जिंकणार आहे, पण मुस्लिमांशिवाय विजय बरा वाटणार नाही. मुस्लिम कामासाठी माझ्याकडे आले, तर मी विचार करेन की यांची कामे करून काय फरक पडणार आहे? परतून काहीही न मिळता देत राहायला आम्ही काही महात्मा गांधींची मुलं नाही. मी तुम्हाला मैत्रीचा हात पुढे करत आहे. माझ्या कामगिरीविषयी आपण पिलभित मतदारसंघात विचारु शकता. मी तेथून निवडणूक जिंकली आहे. बाकी तुमच्या हातात आहे.