Mango face pack : आंबा म्हटलं की सगळ्यांना आठवतो हापूस आंबा. पण रायवळ , केसर असो वा  लंगडा आंबा हे फळचं खास आहे. पण तुम्हाल माहित आहे का चवदार असलेला आंबा आपल्या त्वचेची चमक देखील वाढवतो. इतकंच नाही तर आंब्यापासून बनवलेलं ब्युटी पॅक त्वचा, केस यांची निगा राखण्यापासून त्यांना चमक आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी वापरण्यात येतात. आज आपण अशाच काही आंब्याचा फेस पॅक रेसिपी जाणून घेणार आहोत. 


हे आंब्याचे घरगुती फेस पॅक लवकर बनवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभर लोक आंब्याची प्रतिक्षा करताना दिसतात. उन्हळ्यात उष्णतेमुळे लोक कितीही हैराण झाले तरी आंबा समोर दिसला की कोणीच त्याचापासून स्वतःला लांब ठवू शकत नाही. क जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेलं आंब्याचं फळ केवळ चव भागवण्यासाठी नाही तर ते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. अँटि-ऑक्सिडेंटयुक्त हे फळ त्वचेला निरोगी ठरवण्यास उपयोगी ठरत,  शिवाय त्वचेमध्ये लवचिकता टिकवूण ठेवण्यास देखील मदत करते. वयानुसार चेहऱ्यावर दिसणार्‍या सुरकुत्या देखील कमी करण्यासाठी आंब्या महत्त्वाचा आहे. आंब्याचे सेवन करण्याव्यतिरिक्त फेस पॅक, फेस मास्क, हेअर मास्क इत्यादी देखील बनवता येतात, जे त्वचेवरील एक्सफोलिएशन, डेड स्किन काढून टाकण्यास आणि त्वचा सुंदर मुलायम बनविण्यास मदत करतात. मात्र तुमचा त्वचेच्या संवेदनशीलतेनुसार सुरुवातील पॅच टेस्ट करून पहा. 


मँगो फेस मास्क: मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये एक पिकलेल्या आंब्याचे तुकडे, एक चमचा मध, एक चमचा दही आणि गुलाबपाणीचे काही थेंब एकत्र करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि हे मिश्रण 15-20 मिनिटे त्वचेवर  राहू द्या. हा फेस पॅक सुकल्यावर पाण्यानं स्वच्छ धुवा. हा फेस पॅक त्वचेचे पोषण देण्यासोबतच हायड्रेट करण्यात मदत करू शकतो.


मँगो बॉडी स्क्रब: एका वाटीमध्ये पाच चमचे आंब्याचा पल्प घ्या आणि ते चांगले मॅश करा. आता त्यात दोन चमचे साखर आणि दोन चमचे ओट्स पावडर घाला. हे सर्व चांगले मिसळा. त्यानंतर ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब घाला आणि नीट मिसळून घ्या. ही पेस्ट तुमच्या  हातावर, पायावर, कोपर आणि त्यासोबत चेहऱ्यावर हळूहळू लावा आणि हलक्या हातांनी स्क्रब करून घ्या. काही वेळ तसेच ठेवून ते धुवा, ही पेस्ट  त्वचेला एक्सफोलिएट करते तसेच मऊ बनवते.


मँगो हेअर मास्क: एक चमचा बदाम तेल, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल, तुम्ही कोणतेही हेअर ऑईल घ्या त्यात पिकलेल्या आंब्याचे तुकडे  मॅश करून घ्या. हे मिश्रण टाळूला लागेल अशा पद्धतीनं लावा. त्यांनतर हे मिश्रण केसांवर 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर आपले केस चांगले धुवा. या  मँगो मास्कनं  केसांना सुंदर चमक आणि ओलावा निर्माण होतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)