मणिपूर : कोरोना आणि महागाईसोबत मणिपूरमध्ये अस्मानी संकट ओढवलं आहे. मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात मोठं भूस्खलन झालं. बुधवारी रात्री जवान राहात असलेल्या ठिकाणी भूस्खलन झालं. यामध्ये 55 जवान अडकल्याची माहिती मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या भूस्खलनात 81 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 18 जवान आहेत. अजूनही बचावकार्य सुरू आहे. अजून दोन ते तीन दिवस लागतील असं सांगण्यात आलं आहे. 


अजूनही 15 जवान बेपत्ता आहेत तर 29 नागरिकांचा शोध सुरू आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मणिपूरच्या इतिहासातील सर्वात वाईट आणि दु:ख घटना असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.


मणिपूरच्या भूस्खलनात मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.