Manipur Latest News: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार (Manipur Violence) सुरु झाला आहे. ताज्या घटनेत मणिपूरमधल्या बिष्णुपूरमध्ये (Vishnupur) तीन जणांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मैतेई समाजाने (Maitei) कुकी (Kuki) समाजावर हिंसाचाराचा आरोप केला आहे. ज्या तिघांची हत्या झाली, ते एकाच कुटुंबातील असल्याचं समोर आलं आहे. या तिघांची हत्या अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यातल्या दोघांचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं आहे. मणिपूरमधल्या तम्पाकमध्ये ही घटना घडली आहे. कुकी समाजावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातील तीन सदस्य घराची राखणदारी करत होते. अचानक कुकी समाजाचे काही लोकं आले आणि त्यांनी तिघांची हत्या (3 Killed) केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हत्याकांडानंतर तम्पाकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. पोलीस आणि सुरक्षादलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक बनली आहे. मणिपूरच्या वेगवेगळ्या भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्याआधाी मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यात पोलीसांच्या चौक्यांची तोडफोड करत मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटकांची लूट करण्यात आली. पुरुष आणि महिलांच्या एका जमावाने हिगांग पोलीस स्टेशन आणि सिंगजामेई पोलीस स्टेशनवर हल्ला करत शस्त्र लुटून नेली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमावाने 19,000 गोळ्या, एके सीरिजची असॉल्ट रायफल, 195 सेल्फ-लोडिंग राइफल्स, पाच एमपी-4 बंदूक, 16.9 एमएम ची पिस्तुल, 25 बुलेटप्रूफ जॅकेट, 21 कार्बाइन, 124 हातगोळ्यांसहित इतर शस्त्र लुटून नेली. 3 मे रोजी 'आदिवासी एकजुटता मार्च' च्या आंदोलनानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला. यात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  मैतेई आणि कुकी समाजात हा हिंसाचार सुरु आहे. मणिपुरमध्ये 53 टक्के मैतई समाज आहे आणि या इम्फाल घाटीत ते राहतात. तर 40 टक्के नागा आणि कुकी समाज आहे. 


जवानाचा मृत्यू
दरम्यान मणिपूर रायफल्सचा जवान टोरुंगबाम ऋषिकुमार यांचा हिंसाचारात मृत्यू झाला. गुरुवारीत इम्फाल जिल्ह्यातील सेनजन चिरांगमध्ये एका अज्ञात बंदूकधाऱ्याने टोरुंगबाम यांच्या डोळ्यात गोळी मारली. यात त्यांचा मृत्य झाला. यात टोरुंगबाम गंभीर जखमी झाले. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला टोरुंगबाम यांचा मृत्यू दुर्भाग्यपूर्ण असल्याची प्रतिक्रिया मणिपूर सरकारने दिली आहे.