Air India Uniform: एअर इंडिया (Air India)ची कमान पुन्हा टाटांकडे परत आल्यानंतर आता कंपनीत अनेक बदल करण्यात येत आहेत. एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममध्ये बदल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत एअर इंडिया एअरलाइनचे क्रु मेंबरचा युनिफॉर्म भारतीय पोशाख असलेली साडी होती मात्र आता हा युनिफॉर्म बदलण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा सर्व कर्मचाऱ्यांचे युनिफॉर्म डिझाइन करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबरपर्यंत एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन युनिफॉर्म मिळणार असल्याची शक्याता आहे. आत्तापर्यंत फ्लाइट अटेंडेंट्स साडीमध्येच दिसत होत्या. मात्र आता त्यांच्यासाठी नवीन लुक तयार केला जात आहे. डिझायनर मनीष मल्होत्रा एअर इंडियाच्या 10,000पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफॉर्म डिझाइन करत आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये केबिन क्रू, कॉकपिट क्रू, ग्राउंड आणि सिक्युरिटी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 


नोव्हेंबरनंतर एअर इंडियाचे सर्व कर्मचारी वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये आपली हायटेक इमेज तयार होण्यासाठी अनेक बदल करत आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या 6 दशकांनंतर एअर इंडियाच्या युनिफॉर्ममध्ये बदल करण्यात येत आहेत. एअर इंडियाने एक ट्विटकरत ही माहिती दिली आहे. Fashion takes flight असं लिहित एक ट्विट केलं आहे. 


एअर इंडियाने केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत करार करत आहोत. आजपासून मनीष मल्होत्रा आमच्या केबिन क्रू, पायलट आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफॉर्म तयार करणार आहेत. आम्ही मनीष मल्होत्रा ​​सोबत काम करत आहोत आणि आमच्या सहकार्‍यांसाठी एक नवीन लुक तयार करत आहोत, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे. 



2023च्या अखेरपर्यंत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफॉर्मची योजना आमलात आणली जाईल. मनीष मल्होत्रा आणि त्यांच्या टीमची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसोबत बैठकी सुरू आहेत. कामकाजासंबंधी कर्मचाऱ्यांची खास गरजा विचारात घेऊन युनिफॉर्म डिझाइन करण्यात येणार आहे. 2022 मध्ये टाटाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर नवीन रंग-रूप देण्याची तयारी सुरू आहे. त्याच अंतर्गंत एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांसाठी डिझायनर युनिफॉर्मची प्लॅनिंगदेखील त्याचाच एक हिस्सा आहे. 


दरम्यान, 1962 मध्ये जेआरडी टाटा यांच्या कार्याकाळाच्या दरम्यान एअर इंडियाच्या एअरहोस्टेस वेस्टर्न ड्रेस परिधान करत होती. यात महिलांच्या युनिफॉर्ममध्ये स्कर्ट, जॅकेट आणि टोपी सामील होती. त्यावेळी टाटा एअरलाइनच्या एअरहोस्टेस एकतर एंग्लो इंडियन किंवा युरोपियन वंशाच्या होत्या. मात्र, त्यानंतर युनिफॉर्म बदलला व त्याजागी साडी हा युनिफॉर्म ठरण्यात आला.