नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंह यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त लिहिलेल्या एका लेखात सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीची कल्पना मूळातच चुकीची होती असं सांगताना माजी पंतप्रधानांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. नोटाबंदीला वर्षपूर्ती होत असताना अर्थव्यवस्थेला बसलेला झटका सर्वांना अनुभवायला मिळत आहेच,चिंता देशातल्या संस्थात्मक रचनेला बसलेल्या धक्क्याची आहे असं मनमोहन सिंहांनी लेखात म्हटलंय आहे.


आज दुपारी नोटाबंदीच्या निर्णयाविषयी डॉ. मनमोहन सिंह पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडणार आहे.