Maratha Arakshan : गेल्या 16 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपोषणस्थळी म्हणजे जालनाला जाणार आहेत. मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) जरांगेंच्या भेटीला जाणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शिंदे आणि अजित पवार जरांगेंना भेटणार आहेत. तर दुसरीकडे आपल्याला भेटीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र मुख्यमंत्री येणार असतील तर त्यांचं स्वागत असून ते आले तरच उपोषण सोडणार असल्याचा पुनरूच्चार जरांगेंनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जात बदनाम होऊ नये म्हणून आपण दोन पावलं माघार घेत असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याची तयारी दर्शवली आहे.  उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उदयनराजे, संभाजीराजे यांनी आले पाहिजे अशी मागणी काल मनोज जरांगे यांनी केली होती. समितीचा अहवाद सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत जरागेंनी दिली. मागण्या मान्य ना झाल्यास 31 व्या दिवशी पुन्हा आंदोलन करेन असा इशाराही जरांगेंनी दिला आहे. 


बुलढाण्यात मराठा क्रांती मोर्चा
बुलढाण्यात  मराठा क्रांती मोर्चाचं (Marath Kranti Morcha) आयोजन करण्यात आलंय. जालन्यातील लाठीचार्जचा निषेध तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शेकडो तरुण रस्त्यावर उतरलेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. माझा बाप केवळ आरक्षणासाठी उपाशी तापाशी बसलाय, हक्कासाठी लढतोय...आमचा हक्क मिळालाच पाहिजे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी हिनं दिलीय. ती बुलढाण्याच्या मोर्चात सहभागी झाली होती. 


ओबीसी आंदोलन सुरु
जरांगे पाटलांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित झालं असलं तरी ओबीसी आंदोलन सुरुच आहे. वेळ पडल्यास ओबीसी आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा ओबीसी आंदोलनातून देण्यात आलाय. नागपुरात ओबीसी आंदोलनाचा आज चौथा दिवस...या आंदोलनातील साखळी उपोषणाचा दुसरा दिवस.. सरकारनं ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास लढा तीव्र करणार असा इशारा ओबीसी आंदोलनातून देण्यात आलाय.. 


संजय राऊत यांची टीका
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केलीय. धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, मराठ्यांना 24 तासात आरक्षण देऊ असं म्हणणारे फडणवीस आता सत्ता असताना आरक्षण का देत नाहीत असा सवाल राऊतांनी विचारलाय. सरकारसोबत कोणत्याही समाजाचं विश्वासाचं नातं राहिली नसल्याची टीकाही त्यांनी केली..