Manoj Muntashir: झी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय.भारतात विविधता असली तर राष्ट्रीयतेच्या भावनेत एकता आहे. राज्य आणि केंद्रामधील विविध विषयांवरील संवाद वाढवणे हा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा उद्देश आहे. झी न्यूजच्या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीतून सुरुवात झाली. त्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हा कार्यक्रम होतोय. या मंचावरुन राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध विषयावंर चर्चा होत आहेत. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार मनोज मुंतशीर यांनी हजेरी लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझा देश आज दोन देशातील युद्धात मध्यस्थी करतोय. मध्यस्थी असाच व्यक्ती करतो ज्याच्याबद्दल दोघांच्या मनात आदर असतो. देशाने खूप जास्त प्रगती केलीय, असं म्हटलं तर चुकीचं ठरेल. खूप मागे आहे, असं म्हटलं तरीही चुकीचं ठरेल, असे मनोज मुंतशीर म्हणाले. माझ्या शब्दामुळे कोणाला इजा होत असेल तर त्याला माझे शब्द नाही तर सत्य हे जबाबदार आहे. काहींना सत्य ऐकायला आवडत नाही, असे ते म्हणाले. 


मी एका विचारधारेसोबत आहे. सत्य, सेना, सनातनच्या बाजुने मी बोलत राहीनं. दुसऱ्यांनी त्यांची बाजू निवडावी, असे ते म्हणाले. सध्या माझ्या मनात राजकारणात यायचा विचार नाहीय. पण मला राजकारणात येण्याची वेळ आली तर सेवेसाठी येईन. माझ्याकडे पैसे, प्रसिद्धी आहे. त्याची गरज नाही. जेव्हा परिवर्तनाची गरज आहे, असे मला वाटेल तेव्हा मी नक्की राजकारणात येईन, असे ते म्हणाले. 


हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुढे 


आम्ही असे हिंदू आहोत जे कोणाला परके मानत नाही. सर्वांच कल्याण व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मी हिंदुत्वाचा चेहरा नाही पण याचा सेवक आहे. सिनेमातील हिंदुंबद्दलची व्याख्या मला बदलायची आहे. हवस का पुजारी असे सिनेमात म्हटलं जातं. गावातील कुख्यात गुंड हिंदुचा पुजारी असतो, गुन्हे करणारा हिंदु असतो, हे सर्व मला बदलायचंय, असे ते म्हणाले. कोणाच्याच धार्मिक कार्यात दगडफेक व्हायला नको. धर्म हा व्यक्तिगत आहे. मी सर्व धर्मासमोर डोके टेकतो. सर्व धारणांचा सन्मान करतो. पण याला कमजोरी समजू नका, असे मनोज म्हणाले. 


अयोध्येत निकाल धक्का देणारा?


अयोध्येतील निकाल स्वीकारायला हवा. काही ठिकाणी आम्ही आमचं म्हणणं पोहोचवायला कमी पडलो असू. आम्ही कायमचं हरणार नाही, असे ते म्हणाले. सध्या ब्राम्हण रिक्षा चालवताना दिसतो, कुठे खांद्यावर विट उचलताना दिसतो. सिनेमांमध्ये ब्राम्हणांबद्दल नॅरेटीव्ह पसरवण्यात आलंय.