नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत होती. यावरुन राजकारण देखील रंगलं होतं. पण आता सुप्रीम कोर्टाने तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर ही एकमेकांवर टीका होऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज तिवारी यांनी म्हटलं की, 'आज त्या लोकांचा पराभव झाला जे सुशांतच्या मृत्यूमागचं कारण लपवत होते. आज न्यायाचा विजय झाला. मी सुशांतच्या कुटुंबियांना भेटलो होतो. कुटुंबाची तेव्हाच उच्चस्तरीय चौकशीची इच्छा होती. कारण न्याय मिळावा आणि सत्य बाहेर यावं.'


भाजप खासदार मनोज तिवारी यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, संजय राऊत हे राजीनाम्याबद्दल का बोलत आहेत. पण राजीनाम्याचा प्रश्नच नाही. हा पण सुशांतच्या मृत्यू मागचं सत्य समोर येण्याचा मात्र प्रश्न आहे.'


'राजीनाम्याची गोष्ट आली तर ती दिल्लीपर्यंत जाईल. विरोधी पक्षाने विचार करुन टीका केली पाहिजे.' असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.


सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, आपल्या राज्याची न्याय व्यवस्था नेहमीच देशातील सर्वोत्कृष्ट राहिली आहे. कोणी कितीही मोठा किंवा छोटा व्यक्ती असला तरी कायद्याच्यावर कोणीही नाही. हे कायद्याचं राज्य आहे. न्याय आणि सत्यासाठी संघर्ष करणारं राज्य आहे. हे कुणावरही अन्याय करणारं राज्य नाही, इथे नेहमीच न्याय आणि सत्याचा विजय होतो.


सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाईबाबत, सरकारमध्ये जे जाणकार आहेत किंवा मुंबई पोलीस आयुक्त किंवा महाधिवक्ता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलू शकतात. ही कायदेशीर आणि न्यायालयीन बाब आहे, यावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही, असंही राऊत म्हणाले.