ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान
तुम्ही जर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट करतात तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
नवी दिल्ली : तुम्ही जर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट करतात तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
तुम्ही क्रेडिट / डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे जवळपास 179 कोटींची अफरातफर झाल्याची माहिती समोर आली आहे. 2017 मध्ये सुमारे 25,800 फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.
आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना म्हटलं की, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे दिले गेलेल्या आकड्यानुसार बँकांनी सांगितले की, एटीएम / क्रेडिट / डेबिट कार्डमधून लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. 10,220 प्रकरणांची नोंद शेवटच्या तीन महिन्यांमध्ये झाली आहे.
रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, शेवटच्या 3 महिन्यात 111.85 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सप्टेंबरपर्यंत तिमाहीत फसवणुकीचे 7372 प्रकरणे, जुनपर्यंत तिमाहित 5148 तर डिसेंबरपर्यंत शेवटच्या तिमाहित 3077 प्रकरणे समोर आली आहेत.