नवी दिल्ली : भारतातील कॉर्पोरेट जगतात मुलांच्या देखभालीसाठी पॅटर्निटी लीव्ह सारख्या सुविधा अद्याप लागू झालेल्या नाहीत. त्यातच काही कंपन्यांनी यापुढेही एक पाऊल टाकलेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉलर फोक नावाच्या एका स्टार्टअपने आपल्या कर्मचाऱ्यांना पाळीव प्राण्याच्या देखभालीसाठी १० दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीच्या फाउंडिंग पार्टनर रुक्मिणी वैश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या कंपनीत कर्मचाऱ्यांना आपल्या प्राणीव प्राण्याची देखभाल करण्यासाठी, त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणे, लसीकरण करण्यासाठी सुट्टी दिली जाते. तसेच टीममधील लोक आपल्या पाळीव प्राण्याला ऑफिसमध्येही आणू शकतात.  


दुसरीकडे मुंबईतील गोझूप या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना प्राण्यांच्या देखभालीसाठी २,०१७ रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतलाय. हा भत्त प्राण्यांचे ट्रेनिंग, ग्रूमिंग, लसीकरण यासाठी वापरला जाऊ शकतो. 


गोझूपचे सीईओ अहमद आफताब यांनी सांगितले, आमच्या अनेक कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे पाळीव प्राणी हे घरातील सदस्यांप्रमाणेच आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते.