Year End ला टेन्शन वाढवणारी बातमी! IT क्षेत्रात मोठ्या संकटाची चाहूल? लगेच तपासून पाहा सॅलरी स्लीप कारण...
Job News : IT क्षेत्र मोठ्या संकटात; आर्थिक मंदीचे परिणाम नेमके कोणत्या स्वरुपात दिसू लागले आहेत? सॅलरी स्लिप व्यवस्थित पाहा, तुमचा पगारही कमी नाही झालाय ना....
Job News : काही वर्षांपूर्वी IT क्षेत्र असं काही प्रकाशझोतात आलं की, अनेकांनीच करिअरच्या वाटा निवडताना या क्षेत्राला पसंती दिली. IT क्षेत्रात असणाऱ्या नोकरीच्या संधी, मिळणारा गलेलठ्ठ पगार, आठवडी सुट्ट्या आणि कामामध्ये सातत्यानं होणारी बढती या आणि अशा अनेक कारणांसाठी सर्वांचाच कल या क्षेत्राकडे होता. इतकंच नव्हे, तर परदेशात जाऊन नोकरी करण्याच्या संधीमुळंही करिअरच्या वेगळ्या वाटांवर निघालेल्या मंडळींनी आयटी क्षेत्र निवडलं. पण, मागील एकदोन वर्षांमध्ये आर्थिक मंदीची चाहूल लागली आणि या क्षेत्रालाही उतरती कळा लागली.
2023 हे वर्ष सरत असतानाच आता IT क्षेत्रातील अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढवताना दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार बंगळुरू या देशातील IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी असणाऱ्या अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. इतकंच नव्हे, तर वार्षिक पगारवाढ, नोकरीतील बढती आणि नव्यानं होणारी नोकरभरती या सर्व प्रक्रियासुद्धा सध्या थांबवण्यात आल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता अनेकजण पगारानंतर Salary Slip तपासून पाहत आहेत.
जागतिक आर्थिक मंदी संपणार कधी?
साधारण वर्षभरापूर्वी सुरु झालेली ही उतरती कळा सहा महिन्यांमध्ये संपून जाईल अशी अपेक्षा प्राथमिक स्वरुपात व्यक्त करण्यात आली होती. पण, हे चित्र काही पालटलं नाही. काही कंपन्यांनी नव्यानं नोकरीवर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ प्रक्रियेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तर, 2023 मध्ये ज्यांना 50 टक्के पगारवाढ मिळाली आहे, त्यांना यंदाच्या वर्षी 20 टक्के किंवा त्याहून कमी पगारवाढ देण्याची शक्यता आहे. तर, पदाची बढती झालेल्यांचा पगार मात्र 10 ते 20 टक्क्यांनीच वाढवण्याच्या तयारीत कंपनी दिसत आहे.
हेसुद्धा वाचा : 'नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की...' जया बच्चन थेटच बोलल्या
2007 ते 2009 या वर्षांमध्येसुद्धा आयटी क्षेत्रावर अशीच काही संकटं ओढावली होती. त्यावेळीसुद्धा मोठ्या संयमानं कर्मचाऱ्यांनी नोकरी टिकवून ठेवली होती. आता या नव्यानं आलेल्या आर्थिक संकटाला कर्मचारी वर्ग नेमका करा सामोरा जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.