डिझेल घरपोच हवंय, करावं लागेल हे काम
घरपोच डिझेल `सफर-20` सुविधेला सुरूवात...
मुंबई : ग्राहकांना डिझेल थेट घरपोच मिळणार आहे.. फक्त एका क्लिकवर ग्रहकांना डिझेलची बुकिंग करता येणार आहे.. दिल्लीत डिझेलची डोअरस्टेप डिलिव्हरी सुरु करण्यात आलीये. त्यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीनं हमसफर इंडियासोबत करार केलाय.. डोअरस्टेप डिलिव्हरीची सुविधा केवळ 20 लीटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या सुविधेला 'सफर-20' असं नाव देण्यात आलंय.
या सुविधेमुळे उद्योग, मॉल्स, रुग्णालयं, बँका, शेतकरी, मोबाइल टॉवर, शिक्षण संस्थांसोबत लघु उद्योगांना याचा फायदा होणार आहे. डोअरस्टेप डिझेलसाठी घाऊक पुरवठा देखील सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
कशी कराल ऑर्डर बुक
घरबसल्या डिझेल ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला हमसफर इंडियाचं 'फ्युअल हमसफर' नावाचं मोबाईल ऍप डाउनलोड कारावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला घरबसल्या 20 लीटरपर्यंत डिझेलचा पुरवठा होईल.
अनेक ठिकाणी सुविधा सुरू
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, केरळ, गुजरात, गोवा, नोएडा, दिल्ली, फरीदाबाद आणि गाझियाबाद यांसोबत अनेत ठिकाणी 'सफर-20' सुविधा ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे.