मराठा आरक्षण सुनावणी १ सप्टेंबर रोजी
सुनावणीपर्यंत कोणतीही नोकर भरती नाही
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. पाच न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी यावेळी केली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणं मांडण्यास अडचणी येत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. तसेच सुनावणीपर्यंत नोकर भरतीला स्थगिती दिली असून याचिकांवर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय आज घेतला आहे.
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूनी युक्तीवाद झाला आहे. त्याचप्रमाणे विरोधकांकडून ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा, मेगाभारतीचा मुद्दा घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. कुठल्याही परिस्थितीत कोणतीही नोकर भरती राज्यात होणार नाही.
२५ ऑगस्ट रोजी पाच सदस्यीयकडे प्रकरण पाठवायचं का यावर चर्चा होणार आहे. जर त्याप्रमाणे करण्यात आलं तर १ सप्टेंबरला सुनावणी होणार नाही. जर याच खंडपीठाकडे राहील तर १ सप्टेंबर पासून दैनंदिन सुनावणी होईल.