सांगली : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे. सांगलीतल्या मांगलेमध्ये आक्रमक आंदोलकांनी जाळपोळ करत राज्य परिवहनची बस पेटवून दिली आहे. त्यामुळे हे आंदोलन अजूनही शांत झालेलं नाही. अजूनही अनेक ठिकाणी थोड्यापार प्रमाणत याचे हिंसक पडसाद उमटताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना जिल्ह्यात आज ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलनाचं आयोजन केलं आहे. जिल्ह्यातील आसई फाटा आणि जाफ्राबाद शहरात चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली असून रस्त्यावर टायर जाळून चक्का जाम करण्यात आला. यामुळे जालना शहर आणि भोकरदनकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. सकाळपासून जिल्ह्यात बससेवा देखील विस्कळीत झाली आहे. बसेसचं नुकसान होऊ नये म्हणून भोकरदन,जाफ्राबाद आणि राजूर सह इतर बस स्थानकातून एकही बस सोडण्यात आलेली नाही. बदनापूर, जालना, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी या ठिकाणीदेखील चक्का जाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.