मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha reservation) दिलेल्या अंतरिम स्थगितीवर आज सर्वौच्च न्यायालयात (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ( five-judge bench) पहिली सुनावणी ( first hearing) होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आरक्षणाबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणाला सर्वोच्या न्यायालयाच्या खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली होती. त्यावर राज्य सरकारनं घटनापीठापुढे सुनावणी घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. यातल्या तीन न्यायाधीशांनीच मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. 


दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. पाच जणांच्या घटणापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुर्ण ताकदीने सरकार या खंडपीठासमोर बाजू मांडले असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. दरम्यान महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या महादेव जानकर यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीनंतर आता राजकीय चर्चेला रंग चढला आहे. 


महादेव जानकर जर महाविकास आघाडीत येणार असेल तर त्यांचे स्वागत असेल असे सांगत शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी जानकरांना एक प्रकारे महाविकास आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे.