Personal Finance: आपल्या दैनंदिन गरजांना पूर्ण करण्यासाठी लोकं बँकेच्या बचत खात्यांमध्ये पैसे जमा करीत असतात. बँकांच्या बचत खात्याचे व्याज दर कमी असल्याने ग्राहकांना फारसा परतावा मिळत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का?  स्वीप इन फॅसिलीटी (Sweep in Facility ) चा लाभ घेऊन तुम्हाला फिक्स डिपॉझिट सारखे व्याज मिळू शकता. स्वीप इन फॅसिलीटी म्हणजे काय? याचा आढावा घेऊ या!


स्वीप इन फॅसिलीटी (Sweep in Facility) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वीप इन फॅसिलीटीमध्ये बचत खात्यावरील रक्कम एका ठराविक मर्यादेपलिकडे गेली. तर मर्यादेपलिकडच्या रक्कमेवर फिक्स डिपॉझिट (FD)प्रमाणेच व्याजदर मिळते. ही मर्यादा वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळी असू शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी (HDFC), पंजाब नॅशनल बँक(PNB), आयसीआयसीआय बँक(ICICI Bank) इत्यादी बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.  


ही बातमी  वाचा - या आहेत देशातील सर्वोत्तम E-Cars, जाणून घ्या किती आहे किंमत?


प्रत्येक बँकांचे नियम वेगळे (Every bank has different rules)


 काही बँका रेग्युलर बचत खात्यालाच स्वीप इन फॅसिलीटीला लिंक करतात. परंतु  काही बँका या सुविधेसाठी वेगळे बचत खाते असण्याला प्राधान्य देतात. जसे की, SBI मध्ये सेव्हिंग प्लस अकाऊंट, HDFC बँकेत स्वीप इन फॅसिलीटी, बॅंक ऑफ इंडियामध्ये सेव्हिंग प्लस योजना, ICICI बँकेत मनी मल्टीप्लायर अकाऊंट इत्यादी... याप्रमाणे प्रत्येक बँकेचे स्वीप इन फॅसिलीटीचे नियम वेगळे असतात. 
 
 स्वीप इन फॅसिलीटी कशी सुरू करावी?


  • कोणत्याही बचत खात्याला फिक्स  डिपॉझिट (FD) खात्याला लिंक करणे.

  • ठराविक मर्यादा पलिकडची रक्कम लिंक केलेल्या फिक्स डिपॉझिट खात्यात वर्ग केली जाईल.

  • बँकांच्या इंटरनेट बँकिंगद्वारा अर्ज करणे सर्वात सोपा पर्याय आहे. 

  • बँकेत जाऊन ऑफलाईन अर्जदेखील करता येतो.

  • खातेधारक विशिष्ठ FD सुविधेची निवड करू शकतात. 


 
 बचत खात्यावरील व्याज  दर (Interest rate on savings account)


  देशातील महत्वाच्या बँकांच्या बचत खात्यांवर किती टक्के व्याज मिळते. यावर एक नजर 


  • SBI 2.7 % ( P.A)

  • ICICI 3 - 3.50 % (P.A)

  • HDFC 3 - 3.50 % (P.A)