Gold price today | कोरोनानंतर सर्वात मोठी सुवर्ण खरेदीची संधी
तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर सध्याचे दिवस तुमच्यासाठी अगदी योग्य आहेत
मुंबई : तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर सध्याचे दिवस तुमच्यासाठी अगदी योग्य आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या ( gold price ) दरांत मोठी घसरण सुरू आहे. ही घसरण अद्यापही थांबलेली नाही. आजही मुंबईमध्ये सोन्याचा दर 43 हजार 900 प्रति तोळा (22 कॅरेट) इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील ( International market ) चढउतारांमुळे सोन्याच्या दरात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. काल (3 मार्च) रोजी देखील सोन्याच्या दरामध्ये घट झाली होती. ही गेल्या 10 महिण्यांतील मोठी घसरण होती. आजही सोन्याचे दर कमी झाले आहेत.
काय आहेत सध्याचे दर
मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर 43 हजार 900 प्रति तोळा इतके होते. तर काल (3 मार्च) रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 44 हजार 370 इतके होते.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर 44 हजार 900 प्रति तोळा इतके होते. तर काल (3 मार्च)रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 370 प्रति तोळा इतके होते.
सोन्याच्या कमी झालेल्या किंमतींमुळे गुंतवणूकदार ( gold investment ) याकडे चांगली गुंतवणूकीची संधी म्हणून पाहत आहे. तर लग्नसराई जवळ असलेल्या लोकांसाठी हा दिलासा आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी होत जाणाऱ्या दरांमुळे लोकांनी सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तुम्हालाही सोने खरेदी करायची असेल तर, हा खरोखरच सुवर्ण काळ म्हणावा लागेल