बडोद्या : बडोद्यात आजपासून 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होतीय. सकाळी साहित्य संमेलनाचे ध्वजारोहण पार पडलं.. अखिल भारतीय मराठी साहित्यमहामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, संमेलनाध्यक्ष, लक्ष्मीकांत देशमुख, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे , सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटीलही यावेळी उपस्थित होते.


साहित्य संमेलनाचे ध्वजारोहण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बडोदा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित पु.आ. चित्रे अभिरुची ग्रंथप्रदर्शनाचं उदघाटन डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते पार पडलं.. मराठीतल्या विविध प्रकाशकांनी या प्रदर्शनात ग्रंथ मांडले आहेत, 91 व्या बडोदा साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र चरित्र साधने खंडांचे प्रकाशन पार पडले. 


आज दुपारी चार वाजता संमेलनाचे उदघाटन


महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने सयाजीराव गायकवाड यांची भाषणे, त्यांची पत्रे, चरित्र पुस्तक रुपानं प्रसिद्ध केली आहेत.  यावेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी झी मराठी दिशाच्या दालनालाही भेट दिली. आज दुपारी चार वाजता संमेलनाचे उदघाटन होणार आहे.