March School Holiday: महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल 2024 पासून सुरु होत असले तरी इतर बोर्डांचे वर्षे एप्रिल 2024 पासून सुरु होते. त्यामुळे मार्चमध्ये या विद्यार्थ्यांना आराम मिळतो. दरम्यान मार्चमध्ये हिंदु आणि ख्रिश्चन धर्मातील अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळे शाळांनादेखील सुट्टी आहे. 5 मार्च रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. तसेच 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. तर 24 मार्च रोजी होलीका दहनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. याची शाळांना सुट्टी असेल. 25 मार्च रोजी होळीची तर 29 मार्च रोजी गुड फ्रायडेची शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी असेल. 31 मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांना इस्टरची सुट्टी असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक शाळांमध्ये शनिवारची सुट्टी असते. या महिन्यात 5 शनिवार आणि रविवार येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मज्जा करता येणार आहे. 


भारतातील अनेक शाळांमध्ये शनिवार आणि रविवारची सुट्टी असते. तर काही शाळांना तिसऱ्या आणि शेवटच्य शनिवारी सुट्टी असते. अशावेळी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सुट्टीचे प्लानिंग करता येते. यासाठी सुट्ट्यांचे कॅलेंडर माहिती असायला हवे. 


महर्षी दयानंद सरस्वती जयंती दिनी आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची जन्म वर्ष साजरे केले जाते. तर महाशिवरात्री पूजेतून महादेवाला वंदना दिली जाते. 


होलीका दहनातून सत्याचा विजय साजरा केला जातो. याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.  या दिवशी हिरण्यकश्यपची बहीण होलिका अग्निपासून मुक्त होते. होलिकाने प्रल्हादला फसवून तिच्यासोबत चितेवर बसवले होते. यामुळे भक्त प्रल्हाद ज्वालेत मरून जाईल असे तिला वाटत होते. पण यात होलिकाच जळून राख झाली होती आणि प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला, कारण प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता.


होळीला रंगांचा सण म्हणतात आणि हा एक उत्साही उत्सव आहे या दिवशी नाचणे, गाणे आणि लोकांवर पाणी, रंग फेकले जातात. ख्रिश्चन धर्मीय येशूच्या वधस्तंभावर स्मरण करण्याचा दिवस म्हणजे गुड फ्रायडे. 


बहुतांश शाळांच्या वार्षिक परीक्षा मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात संपतील. महाराष्ट्रात दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या दरम्यान सुरु असतील. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या सुट्ट्या लागू नसतील.