Wedding Day Ex Girlfriend Reached: भारतासह जगभरातील लग्नाच्या मोसमात वधू-वरांच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. कधी वर तर कधी वधूच्या या गोष्टी असतात. वधु-वरांच्या काही मजेशीर गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण या सगळ्यात लग्नात अनेक ट्विस्ट आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे वराचा एक्स गर्लफ्रेंड लग्नाच्या मंडपातच पोहोचली आणि गोंधळ उडाला. माजी प्रेयसिने सर्वांसमोर असे कृत्य केले की वराला लाज वाटली.


त्याने ही गोष्ट लपवून ठेवली की  एक्स Girlfriendची 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरे तर ही घटना ब्रिटनमधील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वधू आणि वर त्यांच्या लग्नाबद्दल खूप आनंदी होते आणि लग्नाचा दिवस देखील निश्चित करण्यात आला होता आणि पाहुण्यांना लग्नाच्या पत्रिकाही वाटण्यात आल्या. सगळी तयारी झाली आणि लग्नाचा दिवस आला. सर्व पाहुणे आले होते. वराने आपल्या भावी वधूपासून एक गोष्ट लपवून ठेवले होते की त्याला एक्स Girlfriend आहे. ती गोष्ट त्याला खूपच भारी पडली.


लग्नमंडपात असं काही घडलं की, उपस्थितांना बसला धक्का 


लग्नाच्या दिवशी वराची एक्स Girlfriend मंडपात पोहोचली. सुरुवातीला खूप खाल्लं आणि सगळ्यांसोबत गाणं गायलं. यानंतर लग्नविधीचा कार्यक्रम सुरु होताच ती वरच्या मंजावर पोहोचली. तिने वराला शिवीगाळ करत पाण्याचा ग्लास वराच्या तोंडावर फेकला. या संपूर्ण घटनेनंतर तेथील सर्व पाहुणे आवाक झाले. काय झाले आणि का झाले हे कोणालाच समजले नाही.  


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आधी वराची एक्स Girlfriend या घटनेनंतर बाजूला गेली आणि नंतर एका पाहुण्याकडून पाण्याचा ग्लास घेऊन सरळ जाऊन वराच्या तोंडावर पाणी फेकले. त्यानंतर स्वतःहून ती निघून गेली. सध्या या घटनेनंतर वराला ती कोण आहे आणि तिचे तिच्याशी काय नाते आहे हे सर्वांना सांगावे लागले. सुदैवाने त्याचे लग्न पार पडले.