मुंबई: लग्नाच्या मंडपात मजेशीर गोष्टी घडत असतात. त्यात सर्वात जास्त मजा तेव्हा येते जेव्हा वरमाला घालण्याचा मुहूर्त जवळ येतो. वधू-वराला उचलून वरमाला घालण्याचा कार्यक्रम होतो. त्यावेळी मित्र-नातेवाईक अनेक गमती जमती करतात. मात्र एक लग्नात नवरदेवासोबत असं काही घडलं की त्याने पोलखोलच झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नासाठी तुम्ही तयारी करत असाल किंवा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे लग्नासाठी उभं राहताना जरा जपून उभं राहा. नाहीतर तुमचीही गत या नवरदेवासारखी होऊ शकते. 


नेमकं काय घडलं?


य़ा व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की नवरी पहिल्यांदा वरमाला घालते. त्यानंतर नवरदेव वरमाला नवरीच्या गळ्यात घालतो आणि तेवढ्यात त्याच्या पायजम्याची नाडी सुटते. पायजमा खाली घसरतो आणि त्याची भनकही नवरदेवाला काही सेकंद नसते. नवऱ्याचा लग्नमंडपात मोठा हशा होतो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 



लग्नाच्या मंडपात नवरदेवाचा पायजमा सुटला आणि एकच हशा पिकला. या घटनेनंतर स्वत: नवरदेवही मोठ्यानं हसायला लागला. हा प्रकार बघून वधू लाजेनं लाल झाली. हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर अनेकांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. लोकांनी या व्हिडीओला खूप पसंतही केलं आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.


मजेची गोष्ट बाजूला ठेवली तर लग्नाच्या मंडपात असा हशा होणार नाही याची काळजी घेणं आता गरजेचं आहे. नाहीतर या नवरदेवासारखा आपल्याच लग्नात आपला हशा होऊ शकतो.