मुंबई : कोरोना महामारीनंतर (Coronavirus Pandemic) बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. नोकरी पासून लग्नापर्यंत अनेक गोष्टींवर याचा परिणाम झाला. 2 वर्ष लग्नांना ब्रेक लागला होता. अनेकांनी तर काही मोजक्या लग्नाच्या उपस्थितीत लग्न उरकलं. आता एका सर्वेक्षणानुसार नवीन माहिती समोर आली आहे. कोविड-19 महामारीनंतर लोकांनी लग्नाच्या नियोजनात अनेक बदल केले आहेत. एकीकडे पाहुण्यांची संख्या कमी होत आहे. तर दुसरीकडे गुणवत्तेवर अधिक भर दिला जात आहे. (marriage style change after corona marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Weddings.in या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार असं समोर आलंय की, लग्नाच्या नियोजनात 'डिजिटायझेशन' वाढलं आहे. आता सर्वाधिक खर्च केटरिंग, फूड अँड बेव्हरेजेस, मनोरंजन आणि सजावट यावर केला जातोय.


वेबसाईटने ऑक्टोबर 2022 केलेल्या सर्वेक्षणात असं पुढे आलं की, सध्याच्या लग्नाच्या ट्रेंडमध्ये 43 टक्के जोडप्यांनी मोजक्या लोकांमध्येच विवाह सोहळा उरकला. लग्नावरचा खर्च कमी करुन गुणवत्तेवर अधिक भर दिला जात आहे. कमी लोकांना आमंत्रण देऊन जेवण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे लोकं अधिक जागरुक होतांना दिसत आहे.


हजाराहून अधिक लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की, 23.2 टक्के जणांनी मोठा लग्न सोहळ्याला प्राध्यान्य दिलं. तर 17.6 टक्के जोडप्यांनी जवळच्या लोकांमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.


लग्नाच्या पत्रिकांवर केला जाणारा मोठा खर्च टाळून डिजिटल लग्नपत्रिकांवर अधिक भर दिला गेला. डिजिटायझेशनचा अधिक वापर केला गेला.