मुंबई : सध्याचा काळ इंटरनेटचा आहे. इंटरनेटने बऱ्याच गोष्टी सुलभ केल्या आहेत. परंतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. इंटरनेटच्या फायद्याबरोबर तोटे देखील आहेत. याचंच एक उहाहरण म्हणजे मैट्रिमोनियल साइट. यामुळे लोकांना लग्न करण्यासाठी उत्तम जोडीदार निवडता किंवा शोधता येतं. परंतु हे सगळं करत असताना काही गोष्टी लक्षात घेणं देखील गरजेचं आहे. नाहीतर याचा आयुष्यावर चुकीचा परिणाम होतो. वेबसाइट्सच्या माध्यमातून फसवणुकीची प्रकरणेही समोर आली आहेत. म्हणूनच, जर तुम्ही मॅट्रिमोनियल साइट्सवर स्वतःसाठी जीवनसाथी शोधत असाल तर तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुम्हाला येथे सांगतो की तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?


मॅट्रिमोनिअल साइटवर जोडीदार शोधताना या गोष्टी लक्षात ठेवा.


समोरच्या व्यक्तीचे प्रोफाइल नीट तपासा


लग्नासाठी जे काही प्रोफाइल तुमच्या समोर येईल, त्यातील सर्व तपशील नीट तपासून घ्या. यानंतर, त्याचे सर्व सोशल मीडिया प्रोफाइल तपासा. त्याचबरोबर तो त्या प्रोफाईलवर किती दिवस अॅक्टिव्ह आहे आणि त्याने त्याचा फोटो कसा ठेवला आहे हे नक्की तपासा.


कारण फसवणूक करणाऱ्या टोळ्या बनावट सोशल प्रोफाईल तयार करून लोकांना फसवण्याचे काम करतात. त्यामुळे सर्व सोशल प्रोफाईल इत्यादी तपासल्यानंतरच संभाषण सुरू ठेवा.


आर्थिक नुकसान टाळा


वास्तविक जीवनात असो किंवा इंटरनेटवर, फसवणुकीच्या बहुतांश घटनांमागे केवळ पैसा हेच कारण असते. त्यामुळे मॅट्रिमोनिअल साइट्सवर प्रोफाइल बनवताना आणि दुसऱ्याला प्रस्ताव पाठवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेणेकरून भविष्यात कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. अशा परिस्थितीत बँकेत नोंदणीकृत नसलेल्या ईमेल आणि फोन नंबरने तुमचा प्रोफाइल बनवा.


कोणत्याही मुलाशी किंवा मुलीशी फोनवर बोलल्यानंतरच तुमच्या वतीने पैसे हस्तांतरित करू नका. मग समोरच्यानं कितीही सक्ती केली तरी ते करु नका.


लग्न हा आयुष्यातील एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे बनावट वैवाहिक साइट्सच्या मोफत प्रोफाइलच्या आहारी जाऊ नका.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)