Difference Between Court Marriage and Marriage Registration: लग्न हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा (Marriage) टप्पा आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला कधी ना कधी तरी या टप्प्यावर यावेच लागते. आता अनेक तरूण - तरूणी जे लग्नासाठी वधू आणि वराचा शोध घेत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची (Marriage Act) आहे. लग्न आणि त्यासंबंधीचा कायदा आपल्या माहिती असणे महत्त्वाचे असते. त्यातून तरूण पिढीला यासंबंधीची माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा अनेकांना कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन (Difference Between Court Marriage and Marriage Registration) यातील फरक कळून येत नाही. त्यातून आजकाल लग्नाचा खर्च कमी करत अनेक तरूण जोडपी हे कोर्ट मॅरेजही करताना दिसत आहेत. तेव्हा या दोन संज्ञामधील फरक काय आहेत, कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी असते?, ती वेगळी असते का, देशातील यासंदर्भातील कायदा काय आहे ते या लेखातून जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा लोकांना कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन (Marriage Law in India) या दोन गोष्टी या सारख्याच वाटतात. परंतु त्यात फरक आहे. 1954 पासून विशेष विवाह कायदा म्हणजेच स्पेशल मॅरेज अॅक्ट भारतीय न्यायलयानं लागू केला (Special Marriage Act) आहे त्यानूसार कुठल्याही जाती, धर्म आणि संस्कृतीतील व्यक्ती एकमेकांशी लग्न करू शकतात. यासाठी जोडपी ही विवाह निबंधक कार्यालयात विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. 


कॉर्ट मॅरेज म्हणजे काय? (What is Court Marriage)


  • कॉर्ट मॅरेजसाठी तुम्ही मॅरेज ऑफिसर यांच्या साक्षीनं विशेष विवाह कायद्यनुसार कोर्टात लग्न करू शकतात. 

  • यासाठी तुम्हाला अप्लाय करावे लागते. पहिल्यांदा थेट कोर्टात जाऊन तुम्ही लग्न करू शकता.

  • येथे दुसरा विवाह तुमच्या पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याशिवाय होऊ शकत नाही.

  • जर जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही दुसरा विवाह करू शकता. 

  • स्वत:सह लग्नाच्या दिवशी तीन साक्षीदार असावे लागतात. 

  • त्यानंतर नोटीस निबधंकाद्वारे प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांनी कोणी घरातील व्यक्तीनी आक्षेप न घेतल्यास जोडप्यांचे लग्न होऊ शकते. 


मॅरेज रजिस्ट्रेशन म्हणजे काय? (What is Marriage Registration)


  • यासाठी तुम्ही मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन मॅरेज रजिस्टरसाठी रजिस्ट्रारकडे नोंदणीसाठी अप्लाय करू शकता. 

  • कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये फरक आहे. आपल्या परंपरेनुसार तुम्ही लग्न केले असेल तर त्यानंतर तुम्ही मॅरेज रिजेस्ट्रशनसाठी अप्लाय करू शकतात. यासाठी दोन्ही प्रक्रियांसाठी तुम्हाला योग्य ती कागदपत्रे समबिट करावी लागतात. यामध्ये मुख्यत्वे तुमचे ओळखपत्र, जन्मदाखला आणि पत्त्याची कागदपत्रे लागतात. परंतु दोन्ही प्रक्रियांमध्ये वेगवेगळ्या डॉक्यूमेंट्सची गरज असते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)