बिहार : बिहार येथील मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. एका विधवा महिलेसोबत एका व्यक्तीचं प्रेम प्रकरण सुरु होतं आणि ही बातमी कळताच गावकऱ्यांनी एक मोठं पाऊल उचललं. खरंतर या घटनेच्या व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला, ज्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलघडा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील धौल गावातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका ३८ वर्षीय विधवा महिलेचं 45 वर्षीय पुरुषाशी प्रेम प्रकरण होतं. या महिलेचं नाव रिटा देवी आहे आणि तिचा नवरा 7 वर्षांपूर्वी मरण पावला. ज्यानंतर तिच्या आयुष्यात हा व्यक्ती आला.  या 45 वर्षीय व्यक्तीचं लग्न झालेलं आहे आणि त्याला चार मुलं देखील आहेत.


खरे तर दोघेही प्रेमी युगुल एकाच गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या प्रेमाविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना माहिती मिळाली. त्यानंतर या दोघांना फोन करून चौकशी केली. जेव्हा त्यांनी देखील हे मान्य केलं. तेव्हा त्या गावकऱ्यांकडून या दोघांचं लग्न लावण्यात आलं.


या पुरुषाचं आधी लग्न झालेलं असलं तरी, त्याची पहिली बायको आहे की, नाही? किंवा त्यांचा घटस्फोट झाला आहे का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


या दोघांना आधी भर पंचायतीत बोलवण्यात आलं आणि त्यानंतर या व्यक्तीला रिता देवी यांच्या भांगात सिंदूर भरण्यासाठी सांगितले गेले. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना हार देखील घातले. या घटनेचा व्हिडीओ आजूबाजूच्या लोकांनी काढला, जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. यानंतर अनेक गावांमध्ये या लग्नाची चर्चा सुरु झाली, ज्यानंतर हे लग्न आदर्श लग्न ठरलं.