शहीद औरंगजेबच्या वडिलांचा मोदींना 72 तासांचा अल्टीमेटम
72 तासांचा अल्टीमेटम नाहीतर मी बदला घेईल...
पुलवामा: गुरुवारी ईदची सुट्टी घेऊन घरी जात असतांना जवान औरंगजेबचं दहशतवाद्यांनी अपहरण करुन त्याची गोळ्या घालून हत्या केली. पुलवामाच्या कालम्पोरामधून या जवानाचं अपहरण करण्यात आलं होतं. ईदच्या दिवशी औरंगजेबचं गाव सलानीमध्ये शातंता पसरली आहे. गावावर दु:ख पसरलं आहे. मी माझ्य़ा मुलासोबत ईद साजरी करणार होती पण दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. शहीद जवानच्या वडिलांनी सरकारला 72 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी म्हटलं की, मी 72 तासांची वेळ देतो नाहीतर मी याचा बदला घेईल.
लष्करातून रिटायर पित्याचं दु:ख
औरंगजेबचे वडिलांनी म्हटलं की, 'दहशतवाद्यांनी माझा मुलाचं अपहरण केलं. काश्मीरमध्ये 2003 पासून दहशतवाद्यांचा खात्मा झालेला नाही. दहशतवाद्यांनी माझा मुलाला येऊ नाही दिलं. श्रीनगरमध्ये जे नेते बसले आहे त्यांना बाहेर काढा. मी मोदींना 72 तासांचा अल्टीमेटम देतो नाहीतर मी बदला घेण्यासाठी तयार आहे. आम्ही भारतीय लष्कर देशासाठी जीव देण्यासाठी तयार असतो पण आमच्यासाठी काही नसतं.'
औरंगजेबच्या काकाची ही दहशतवाद्यांकडून हत्या
औरंगजेबचे काकांना 2004 मध्ये दहशतवाद्यांनी मारलं होतं. औरंगजेब एकूण 6 भाऊ आहेत. एक भाऊ देखील लष्करात आहे आणि इतर 4 शिक्षण घेत आहेत. औरंगजेबचे वडील देखील लष्करात आहेत.
औरंगजेबचा मृतदेह गुरुवारी पुलवामामध्ये मिळाला. कालम्पोरापासून 10 किलोमीटर दूर गुस्सु गावात त्याचा मृतदेह मिळाला. त्याच्या डोक्यात आणि मानेत गोळ्या मारण्यात आल्या होत्या.
ISI च्या सांगण्यावरुन औरंगजेबची हत्या
भारताच्या गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीरमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी पाकिस्तानची एजेंसी आयएसआयने ही हत्या केली. भारतात अशांती पसरवण्यासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया केल्या जात आहे. भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येमागे लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा हेतू असल्याचं म्हटलं आहे.