Trending: मसाला डोसा हा आपल्या सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे. त्यातून आपल्या सर्वांनाच नाश्त्याला किंवा अगदी जेवणातही मसाला डोसा खावासा वाटतो. आपल्याला जून्या गोष्टींचे कुतूहलही खूप असते त्यामुळे आपल्यालाही कायमच अशा कोणत्या गोष्टी इंटरनेटवर व्हायरल झालेल्या दिसल्या तर त्या आपण आवर्जून पाहतो आणि एकमेकांना शेअर करतो. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा फोटो आहे पन्नास वर्षांपुर्वींचा. या फोटोत तुम्ही पाहू शकता की हे पन्नास वर्षांपुर्वीचं डोश्याचं बिल आहे. यावेळी मात्र या तुम्हाला कळून आश्चर्य वाटेल की पन्नास वर्षांपुर्वी डोश्याची किंमत नक्की होती तरी किती? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता डोसा हा शंभर रूपयांपर्यंत महाग मिळतो. त्यामुळे आपल्याला याासाठी अनेक पैसे मोजावे लागतात परंतु तरीही आपण आवडीनं हा डोसा खातो. तेव्हा डोसा आणि कॉफीही प्रचंड लोकप्रिय होती. नोकरदारवर्गही त्यावेळी डोशा आणि कॉफी आरामात घेत होता. त्यावेळी रेस्टोरंट्समध्ये मसाला डोसा आणि कॉफी पिण्याची मज्जाच काहीशी निराळी होती. आताही मित्रांसमवेत जाऊन आपण डोसा खातोच खातो. होय, तेव्हा चला तर मग पाहूया की, तेव्हा म्हणजे 50 वर्षांपुर्वी 1972 साली डोसा आणि कॉफी नक्की कितीला मिळायची? 


तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल परंतु या बिलावर तुम्ही पाहू शकता की डोसा 1 रूपयाला आणि कॉफी 1 रूपयाला असं करत डोसा आणि कॉफी मिळून चक्क 2 रूपयांना मेनू मिळत होता. दक्षिण भारतीय पदार्थ बहुतेकांना आवडतात. लोकांना इडली-डोसा, वडा-उत्तपम अशा गोष्टी खायला आवडतात. आजही लोक चौका-चौकात, गल्ल्यांमध्ये डोसे बनवताना दिसतील. सध्या लोक 50 ते 200 रुपयांपर्यंत डोसे विकत आहेत, पण 50 वर्षांपूर्वी डोसा कोणत्या किमतीला विकला जात होता हे तुम्हाला माहिती आहे का? 28 जून 1971 रोजी मोती महल रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने मसाला डोसा खाल्ला होता आणि एक कप कॉफीही घेतली होती.


मसाला डोस्याची किंमत एक रुपया आणि कॉफीची किंमतही एक रुपया होती. मसाला डोसा आणि कॉफी 2 रुपये, सेवा कर 6 पैसे आणि सेवा शुल्क 10 पैसे घेण्यात आले. उपहारगृहाच्या बिलात एकूण दोन रुपये 16 पैसे घेतले. म्हणजे पूर्वी लोकांना 2 रुपयात पुरेसे खाणे-पिणे मिळायचे. सध्या हा फोटो सगळीकडेच व्हायरल होतो आहे.