नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विरोधात जनआंदोलन छेडणार आहेत. कोरोना वायरसपासून वाचण्यासाठी स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडून शपथ दिली जाणार आहे. देशात ६७ लाखाहून अधिक जण कोरोना वायरसच्या संपर्कात आलेयत. पण यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.हिवाळा आणि त्यात आलेल्या सणांमध्ये कोरोना वेग वाढू नये यासाठी पंतप्रधान जनतेला आवाहन करणार आहे. मास्क वापरणे, दोन फुटांचे अंतर आणि सतत हात धुवण्याचा संदेश पंतप्रधान देणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८५.०२ टक्क्यांवर पोहोचलीय. पंतप्रधानांच्या नव्या मोहिमेतून १३५ कोटी भारतीयांना कोरोना विरोधात लढण्याची शपथ दिली जाईल. देशवासिय कोरोनापासून स्वत: आणि कुटुंबाचा बचाव करण्याची शपथ घेतील.


दहावा व्यक्ती बाधित 


'जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.' WHO ने केलेल्या वक्तव्यानुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.



जगभरात १० टक्के लोक कोरोनाबाधित आहेत. म्हणझे जगभरातील जवळपास ७६९० करोड लोकसंख्येत जवळपास ७६ करोड लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. WHO नुसार, जगभरात जवळपास ३.५ करोड लोकांना कोरोनाची लागण झाल्याचेही सांगण्यात आले.


यासोबतच WHO ने भविष्यात कोरोनाची परिस्थिती अधिक खराब होण्याची चेतावणी दिली आहे. WHO च्या डॉ. मायकल रियान यांनी म्हटलं आहे की,'हे आकडे गावात आणि शहरात वेगवेगळे असू शकतात. तसेच वेगवेगळी वयोमर्यादा देखील असू शकतात. यानुसार, जगभरातील अधिकांना कोरोनाची लागण झाली असेल.'


बैठकीत सांगितल्याप्रमाणे,'महामारीचा संसर्ग अजूनही होत आहे. तसेच संक्रमणापासून वाचण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या संक्रमणातून अनेकांचा जीव वाचला आहे.' डॉ. रियान यांच्या म्हणण्यानुसार, साऊथ-ईस्ट एशियात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती जास्त बिघडलेली आहे. यूरोप आणि पश्चिमच्या भागात डेथ रेट सर्वाधिक आहे. तर आफ्रिका आणि पश्चिम देशात कोरोनामुळे परिस्थिती सकारात्मक आहे.


९ व्हॅक्सीन पाइपलाइनमध्ये


WHO ने दिलेल्या माहितीनुसार, ९ कोरोना व्हॅक्सीन पाइपलाइनमध्ये आहे. त्यामुळे लस बाजारात आल्यावर त्याचं समान वाटप होणं हे आव्हान आपल्यासमोर आहे. आतापर्यंत १६८ देश या कोवॅक्स फॅसिलिटीत सहभागी झाले आहेत. फक्त चीन, अमेरिका आणि रशिया या देशांचा यामध्ये समावेश नाही.