Dhanbad Fire: झारखंडमधील धनबाद (Dhanbad Fire) येथे अत्यंत भयानक घटना घडली. लग्न सोहळ्याची तयारी सुरु असताना इमारतीत भीषण आग लागली. या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. घरातील 17 जणांचा मृत्यू झाला असताना नवरीने सप्तपदी घेतली. हा ह्दयद्रावक प्रकार पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडच्या धनबाद येथील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये मंगळवारी सायंकाळी  साडे सहाच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुबोध लाल यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने खूप पाहुणे त्यांच्या घरी आले होते. यावेळी अचानक अपार्टमेंट अचानक आग लागली.


100 पेक्षा अधिक लोक या आगीत अडकले होते. या पैकी बहुतेक जण लग्न सोहळ्यासाठी आलेले होते. आगीचे वृत्त समजताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केले. अनेकांना बाहेर काढण्यात  अग्नीशमन दलाला यश आले. यात नवरीचा देखील समावेश होता. मात्र, 17 जणांचा मृत्यू झाला.


लग्न समारंभात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे नवरी तणावात होती.  बचावलेल्या लोकांनी नवरीला लग्न मंडपात नेले. एकीकडे मोठी दुर्घटना घडली असताना एकीकडे हा लग्न सोहळा पार पडला. लग्नाच्या विधी सुरु करण्याआधी नवरी सतत कुटुंबियांबाबत चौकशी करत होती. मात्र, तुझे नातेवाईक जखमी असून त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु असल्याचे या नवरीला सांगण्यात आले.


लग्न सोहळ्यादरम्यान धर्मिक विधी करत असताना दिवा पेठवताना ठिणगी उडाली आणि भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत नवरीच्या कुटुंबातील 17 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या आगीत नवरीची आई, बहिण, आजोबा, काकीसह अनेक नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे.