चंडीगड : हिमाचल प्रदेशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याच्या घटना सुरुच आहेत. राजधानी शिमलामध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास भट्टाकुफर डोंगराचा काही भाग अचानक कोसळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक झालेल्या भूस्खलनामुळे मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. यामुळे रस्त्यावर असलेल्या अनेक गाड्या ढिगा-याखाली गाडल्या गेल्याची माहिती समोर येत आहे. या गाड्यांमध्ये कुणी होतं की नाही यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.


या घटनेनंतर घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. तसेच ढिगाराही काढण्याचं काम सुरु आहे.


भूस्खलन झाल्याने रस्त्यावर दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भूस्खलन होतानाची घटना कॅमे-यात कैद झाली आहे.



दरम्यान, शुक्रवारीही चंडीगड-मनाली हायवेवर भूस्खलन झाल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला होता.