Woman Raped Murdered: जुन्या प्रियकरासोबत नातं निभावण्यासाठी सुरु असलेला संसार सोडून पळालेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा या धार्मिक शहरात हा प्रकार समोर आला. यानतंर परिसरात एकच खळबळ उडाली. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 दिवसांपूर्वी प्रियकरासह पळून जाऊन राहायला गेलेल्या विवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. मथुरेतील गोवर्धन पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्ण विहार कॉलनीत ही घटना घडली. यावेळी मृत महिलेच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यू नेमका कसा झाला? याची योग्य माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. शम्मी असे प्रियकराचे नाव असून हरजिंदर कौर असे पळून गेलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. 


शम्मी आणि हरजिंदर हे  प्रेमीयुगुल कुरुक्षेत्र, हरियाणाचे रहिवासी आहेत. दोघेही शेजारील गावात राहायचे. कुरुक्षेत्रातच या दोघांचे प्रेम फुलले होते. घरच्यांना यांच्या प्रेमाची माहिती मिळाली होती. यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे लग्न लावून दिले.  दोघांचीही लग्न झाले तरी दोघेही एकमेकांना भेटत राहिले.


पोलिसांनी प्रियकर शम्मीची प्राथमिक चौकशी केली. मी आणि हरजिंदर कौरने एकत्र जगण्या आणि मरण्याची शपथ घेतली होती. यानंतर हरजिंदर कौर आपल्या कुटुंबाला सोडून 25 नोव्हेंबर रोजी पळून आली. यानंतर आम्ही दोघेही मथुरेला आलो, अशी माहिती शम्मीने दिली. येथे गोवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेवाकुंज आश्रमाजवळ असलेल्या कृष्ण विहार कॉलनीत 22 हजार रुपयांच्या तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये ते भाड्याने राहू लागले होते. 


प्रियकर आणि मैत्रीण, दोघेही आधीच विवाहित, नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी येथे आले होते. दोघेही 15 दिवसांपूर्वीच येथे राहायला आले होते. प्रियकर शम्मी हरजिंदर कौरला स्वत:ची पत्नी म्हणायचा. दरम्यान दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. रविवारीही दोघांमध्ये वाद झाला होता. यानंतरच हरजिंदर कौरचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


हरजिंदर कौरच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागावर जखमेच्या खुणा आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असून प्रियकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.