मायावतीच्या बसपाला कर्नाटकमध्ये एका जागेवर आघाडी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या मतमोजणीदरम्यान बहुजन समाज पार्टीला यश मिळताना दिसतेय. .
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या मतमोजणीदरम्यान बहुजन समाज पार्टीला यश मिळताना दिसतेय. कोलेगल विधानसभेच्या जागेवर मायावतीच्या पक्षाने आघाडी मिळवलीये. येथे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार एन महेश, काँग्रेसचे उमेदवार एआर कृष्णमूर्ती यांच्या पुढे आहेत. भारतीय जनता पार्टीचे जीएन ननजुंदा स्वामी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देवेगौड़ाच्या पार्टीला जनता सेक्युलरने बहुजन समाज पार्टीसोबत निवडणूक लढवली होती. मायावतीच्या पक्षाने २० जागांवर आपले उमेदवार दिले होते. या जागेवर जर मायावतीच्या उमेदवाराने विजय मिळवला तर त्यांच्यासाठी हे मोठे यश असेल.