नवी दिल्ली : राजकारणात काहीही घडू शकते हे पुन्हा एकदा दाखवून देणारी आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकेल अशी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये रविवारी घडली. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (सपा) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांच्यातील तब्बल २३ वर्षे चालत आलेले वैर अखेर संपृष्टात आले. सलग सहा दिवस झालेल्या मॅरेथॉन चर्चे नंतर हा निर्णय पहायला मिळाला.


मॅरेथॉन चर्चेनंतर तोडगा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या प्रदीर्घ चर्चेत प्राथमिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही मत आजमावण्यात आले. त्यांना विश्वासात घेण्यात आले. दरम्यान, बसपाने गोरखपूर आणि फूलपूर मतदार संघात सपाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचेही जाहीर केले. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचेही ठरवले आहे. मात्र, अद्याप या आघाडीबाबत कोणत्याही प्रकारे जाहीर वाच्यता करण्यात आली नसली तरी, दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेले आणि २३ वर्षे चालत आलेले वैर संपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


समाजवादी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षातील वैर हे असे अचानकच नाही संपले. त्याची सुरूवात २७ फेब्रुवारीदरम्यान झाली होती. जेव्हा पक्षाचे उच्च धोरणकर्ते राम गोपाल यादव यांनी हा मुद्दा बसपचे राष्ट्रीय महासचीव सतीश चंद्र मिश्रा याच्याकडे उपस्थित केला होता. तेव्हापासून दोन्ही पक्ष आघाडीबाबत निर्णय चर्चा करत होते.


मायावती आणि अखिलेशने यांच्या संमतीने चर्चा पुढे सरकली


बसपच्या सर्वेसर्वा मायावती आणि सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या चर्चेला हिरवा कंदिल दाखवताच दोन्ही पक्षांकडून चर्चेला सुरूवात झाली.चर्चा विस्तारित स्वरूपात झाली. चर्चेदरम्यान, दोन्ही पक्षांनी आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली. या सहमतीनुसार बसप सपच्या उमेदवारांना राज्यसभेसाठी मदत करेन. तर, सप बसबच्या उमेदवारांसाठी विधान परिषद निवडणुकात मदत करणार आहेत.