डॉक्टरांचा उद्या संप, रुग्णसेवा कोलमडणार
डॉक्टरांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
मुंबई : लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी डॉक्टरांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या मध्यवर्ती संघटनेने उद्या बुधवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. २४ तासांसाठी हा संप असणार आहे. ३१ जुलै रोजी २४ तासांचा हा संप असणार आहे.
या संपादरम्यान देशभरातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. 'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया'च्या (एमसीआय) जागी नवीन आयोग स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाला देशातील डॉक्टरांचा विरोध आहे. त्यामुळे डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे.