नवी दिल्ली : ही बातमी आहे तुमच्या कामाची. घरातील महत्त्वाची औषधे, गोळ्या संपल्या असतील तर आजच आणून ठेवा कारण उद्या देशभरातली औषधांची दुकानं बंद राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औषध विक्रीसंदर्भात घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या निषेधात हा संप पुकारण्यात आलाय. औषध विक्रीसंदर्भातली सगळी सविस्तर माहिती एका पोर्टलवर अपडेट करणं मेडिकल दुकानांना बंधनकारक करण्यात आलंय. 


तसंच औषध विक्रेत्यांना दिलं जाणारं कमिशन, यासंदर्भातही नवे नियम तयार करण्यात आले आहेत. या सगळ्या नियमांसंदर्भात केमिस्ट असोसिएशननं सरकारकडे निषेध व्यक्त केला होता. पण सरकारकडून काहीच प्रतिसाद न आल्यानं उद्या एक दिवस देशभरातली औषधांची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.