मुंबई : गुड्स अँड सर्विस टॅक्सने अनेक गोष्टींच्या किंमती केल्या आहेत तर अनेक गोष्टींच्या किंमती वाढल्या देखील आहेत.


औषधांच्या किंमती वाढवल्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटीमुळे मात्र आता रुग्णाच्या समस्या वाढल्या आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर आता औषध कंपन्यांनी औषधांच्या किंमती वाढवल्या आहेत. GST लागू झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी आधी औषधांवरील फायदा कमी केला पण आता औषध बनवणाऱ्या कंपन्यांची याच्या किंमती वाढवल्या आहेत.


सर्वसामन्यांना फटका


एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, एमआरपीच्या किंमती वाढवून कंपन्यांनी आपला फायदा वाढवला आहे. कंपन्यांनी 10 ते 20 टक्के रक्कम वाढवली आहे. यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.


न्यूट्रीशियन प्रोडक्टवर सर्वाधिक जीएसटी


GST मध्ये सरकारने वेगवेगल्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळी औषधे ठेवले आहेत. लाइफ सेविंग ड्रगवर 5 टक्के, जनरल कॅटेगरीवर 12 टक्के, कॉस्मेटिक आणि डर्मेटोलॉजी रेंजवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आलं आहे. प्रोटीन, न्यूट्रीशियन टॅबलेट, सीरप आणि इतर उत्पादनांवर सर्वाधिक 28 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.