नवी दिल्ली :  संसदेचं लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं असून आता एक धक्कादायक बातमी आली आहे. लोकसभेतील मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोनाची लागण झाली होती. रविवारी पाच खासदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. लोकसभेतील खासदारांची कोरोना चाचणी केली होती. काही खासदारांचे काल रिपोर्ट आले तर काहींचे आज. त्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत ही माहिती दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात पाच जणांचा रिपोर्ट पाॅजिटीव आला आहे तर अद्याप काही खासदारांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी होते. ते आता आले असून एकूण १७ खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खबरदारी घेण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.



संसदेत घेतली जाणारी खबरदारी  


यावेळी संसद शनिवारी आणि रविवारी सुरू असणार आहे.
सकाळी लोकसभा आणि दुपारी राज्यसभा असे कामकाज असेल
लोकसभेत आणि राज्यसभेत कागदाचा वापर कमी करण्यात आलाय.
यावेळी संसद भवनात संपूर्णपणे डिजिटल पत्रव्यवहार होईल.  
खासदार आपली उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवतील.  



सभागृहात प्रवेश करणा-या सर्व लोकांचे शरीराचे तापमान तपासण्यासाठी थर्मल गन आणि थर्मल स्कॅनर वापरल्या जातील.  
ठिक ठिकाणी टचलेस सॅनिटायझर्स बसविण्यात येतील 
लोकसभेत आणि राज्यसभेत आपत्कालीन व्यवस्था असेल
लोकसभेत आणि राज्यसभेत  वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे
लोकसभेत आणि राज्यसभेत स्टँडबाईवर रुग्णवाहिकादेखील असतील.  
लोकसभेत आणि राज्यसभेत  संसर्ग रोखण्यासाठी सातत्याने स्वच्छताही केली जाईल.