राष्ट्रपती निवडणूक: मीरा कुमार विरुद्ध रामनाथ कोविंद लढत
यूपीएने राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उम्मेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांचं नाव निश्चित झालं. बैठकीला १७ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की ते सेक्यूलर पक्षांना मीरा कुमार यांना समर्थन देण्याची मागणी करणार. मीरा कुमार २७ जूनला अर्ज दाखल करणार आहेत.
नवी दिल्ली : यूपीएने राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उम्मेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांचं नाव निश्चित झालं. बैठकीला १७ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की ते सेक्यूलर पक्षांना मीरा कुमार यांना समर्थन देण्याची मागणी करणार. मीरा कुमार २७ जूनला अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसकडून सोनिया गांधी, मनमोहन सिंह, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, एके एंटनी, मल्लिकार्जुन खडगे, बीएसपीमधून सतीश मिश्रा, टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन, केरल काँग्रेसचे जॉर्ज मनी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल, आरएलडीचे अजीत सिंह, नॅशनल कॉन्फ़्रेंसचे उमर अब्दुल्ला, एनसीपीचे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, तारिक अनवर, सीपीएमचे सीताराम येच्यूरी, सीपीआयचे डी राजा, आरएसपीचे प्रेमचंद्रन, डीएमकेचे कनिमोझी, जेएमएमचे हेमंत सोरेन, जेडीएसचे दानिश अली खान, ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट प्रतिनिधी, मुस्लिम लीगचे कुंजली कुट्टी, आरजेडीचे लालू यादव आणि जयप्रकाश नारायण यादव या बैठकीत सहभागी झाले होते. बुधवारी काँग्रेस नेता मीरा कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.