Thief stolen idol of the goddess : कोरोनानंतर देशातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता चोराला मनात पण भीती असते, याचा प्रत्यय दर्शवणारा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मेरठमधील एका मंदिरातून (Balmukhi Mata temple) मूर्ती चोरीला गेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीये. एका तरुणाने थेट मंदिरातील देवीची मुर्तीच पळवल्याचं पहायला मिळालंय. चोराने नेमकं काय केलं? याची व्हिडीओ (CCTV Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरठच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील स्पोर्ट्स स्टेडियमजवळ बालमुखी मातेचे (Meerut Balmukhi Mata temple) मंदिर आहे. आचार्य प्रदीप गोस्वामी जेव्हा रविवारी सकाळी मंदिरात पोहोचवले तेव्हा त्यांना धक्काच बसला. दुर्गादेवीची अष्टधातूची मूर्ती न मिळाल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, मंदिरात कुठंही मुर्ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही (CCTV Video) तपासण्यास सांगितलं. त्यावेळी संपूर्ण प्रकार समोर आला.


एक तरुण मंदिरात येतो. त्यावेळी निळ्या रंगाचं जर्किंग घातलेलं असतं. तर डोक्यावर काळी टोपी होती. मंदिरात आल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं अन् मंदिरातील मुर्ती उचलण्याचा प्रयत्न केला. काही सेकंदात त्याने मंदिरातील महागडी मुर्ती उचलली अन् जर्किंगमध्ये टाकून मुर्ती लंपास केली. त्याआधी त्याने देवासमोर हात जोडले अन् कान पकडले.. जणू काही चोरी करण्याआधी तो देवाकडे माफीनामा मागतोय. 57 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये चोराचा कारनामा समोर आला आहे. 


पाहा Video



 पोलिस म्हणतात...


मेरठ पोलिसांनी एक निवेदन जारी केलंय, सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या मंदिरात जाऊन एका व्यक्तीने देवी मातेची मूर्ती चोरली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख पटवली जात आहे. त्याआधारे अटक करून मूर्ती जप्त करण्यात येणार आहे, असं मेरठ पोलिसांनी म्हटलं आहे.